03:26pm | Sep 19, 2024 |
सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने शाहूनगर, गोडोली, सदर बाजारच्या काही परिसरात वारंवार करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. खंडित पाणीपुरवठ्याला वैतागलेल्या शाहूनगर परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी घेराव घालत प्रत्यक्ष जाब विचारला. या संदर्भात या विस्कळीत पाणीपुरवठ्याची तक्रार उदयनराजे भोसले यांच्याकडे करण्यात आली. तांत्रिक अडथळ्यांवर मात करून पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंता गडकरी यांनी दिले.
साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक सागर भोसले सामाजिक कार्यकर्ता अॅड. वर्षा देशपांडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना खंडित पाणीपुरवठ्याचा जाब विचारला. माहुली येथील पाणी उपसा केंद्रातील उपसा पंपाची अडचण. तसेच खंडित पुरवठा यामुळे पाणीपुरवठा खंडित होत असल्याची तांत्रिक अडचण शाखा अभियंता गडकरी मॅडम यांनी सांगितली. पंपिंग स्टेशन मध्ये लाईट नसणे, वारंवार लाईट जाणे, ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड होणे, अशी कारणे आम्हाला वारंवार सांगितली जातात. अशी तक्रार सागर भोसले यांनी केली. तसेच माहुली येथील पंपिंग स्टेशनवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सुद्धा बेमुदत आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सुद्धा पाणीपुरवठा करायला जीवन प्राधिकरणाकडे प्रत्यक्ष कर्मचारी उपलब्ध नाहीत. प्राधिकरण आणि कंत्राटी कर्मचारी यांच्यातील वादाचा प्रत्यक्ष फटका शाहूनगर मधील नागरिकांना बसत असून, पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांच्या दैनंदिन कामाचा खोळंबा होत आहे. याकरता शाहूनगर येथील जय सोशल फाउंडेशन व शाहूनगर ग्रामस्थ यांनी हा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अन्यथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक उद्योजक सागर भोसले यांनी ही तक्रार थेट उदयनराजे यांना कथन केली. उदयनराजे भोसले यांनी गडकरी मॅडमशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून तांत्रिक अडचणी दूर करून पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करा. यासंदर्भात निधीचे काही सहकार्य लागल्यास तसे प्रस्ताव देण्याविषयी सूचना केली. शाहूनगर नागरिकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सागर भोसले, वर्षा देशपांडे, सतीश यादव यांनी केले. यावेळी शाहूनगर गोडोली सदर बाजार परिसरातील बहुशांश नागरिक उपस्थित होते.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |