सातारा शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
तीनजणांवर कारवाई; 66 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
by Team Satara Today | published on : 26 May 2025

सातारा : सातारा व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या चक्री व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडी टाकून कारवाई सत्र राबवले.करंजेनाका परिसरात जयदिप पोपटराव यादव (वय 42, रा. वाढे ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून 20 हजार 200 रुपये किंमतीचा कॉम्प्यूटर, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दुसरी कारवाई राजवाडा परिसरात निखील नामदेव सपकाळ (वय 28, रा.करंजे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून 21 हजार रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य, कॉम्प्यूटर, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तिसरी कारवाई अविनाश सदाशिव साठे (वय 30, रा. सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून 25 हजार 200 रुपयांचे साहित्य जप्त केले. यामध्ये जुगाराचे साहित्य, सीपीयू, की बोर्ड, माउस, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई अजंठा चौक परिसरात केली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा