सातारा : सातारा शहर पोलिसांनी जुगार प्रकरणी तीन जणांवर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कामाठीपुरा, सातारा येथील एका अपार्टमेंटच्या समोरील पत्र्याच्या शेडच्या आडोशास जुगार खेळताना अशोक मनोहर गीते रा. करंजे सातारा, ओमकार राजू भिसे रा. सैदापूर सातारा आणि संदीप माने रा. गोडोली सातारा हे आढळून आल्याने त्यांच्याकडून 33 हजार 66 रुपये रोख, जुगाराचे साहित्य आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.