जयपूर : जयपूरमध्ये एक भयानक घटना घडली आहे. जयपूरमधील सवाई मान सिंह (SMS) रूग्णालयात आयसीयूमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भीषण आगीमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिलांचा देखील समावेश आहे. ट्रॉमा सेंटरमधील आयसीयू वॉर्डच्या स्टोअरमध्ये आग लागली.
जयपूरमधील सवाई मान सिंह (SMS) रूग्णालयात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे. रूग्णालयात आग लागल्याची समजताच त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. रूग्णालय परिसरात मदतीसाठी लोकांची धावाधाव सुरू झाली.
रूग्णालयात लागलेली आगीमुळे ट्रॉमा सेंटरच्या आयसीयू वॉर्डमध्ये मोठे नुकसान झाले. आग लागल्यामुळे या ठिकाणी विषारी गॅस तयार होण्यास सुरूवात झाली. यमध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य तीन रूग्णांची स्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची सहणक व्यक्त केली जात आहे.
ही घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये 11 रूग्ण होते. त्याच्या शेजारी आयसीयूमध्ये 13 रूग्ण होते. या घटनेच्या चौकशीसाठी 6 सदस्यांच्या समितीची घोषणा करण्यात आली आहे. आग लागल्याचा अलार्म वाजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पूर्ण वॉर्डमध्ये धूर झाला होता. आत जाण्याचा मार्ग सुद्धा दिसून येत नव्हता. यावेळी दसऱ्या बिल्डिंगमधून आग लागलेल्याच्या बिल्डिंगच्या काचा काढून पानी मारण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ते दीड तसंच अवधि लागला.