सातारा : अजिंक्य बझार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक ते दोन दरम्यान सारिका लक्ष्मण खडतरे रा. शाहूनगर, सातारा यांची यामाहा कंपनीची दुचाकी क्र. एमएच 11 सीएफ 7014 अज्ञात चोरट्याने अजिंक्य बजार चौक, शाहूनगर, राधाकृष्ण केटरर्स व स्नॅक्स दुकानासमोरून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.