10:37pm | Jun 10, 2024 |
सातारा : सैनिक स्कूलच्या नावाखाली पालकांची दिशाभूल करत प्रायमरी सैनिक स्कूलच्या प्रशासनाने तब्बल 68 टक्के फी वाढ केली आहे. त्या फी वाढीच्या विरोधात व शाळ 2 चे प्रशासन किंडर गार्डन प्रायमरी स्कूलच्या विरोधात पालक आक्रमक झाले असून अन्यायकारक फी वाढ कमी करण्यासाठी सातारचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला. शासनाच्या नियमानुसार जी काय असेल ती फी वाढ करणे अपेक्षित असताना शाळा व्यवस्थापनाने केलेली फी वाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे पालकांनी जोपर्यत शाळा व्यवस्थापन फी वाढ कमी करत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे सांगत संबंधित व्यवस्थापनावर चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
सातारा शहरात सदरबाजार भागात प्रायमरी सैनिक स्कूल आहे. हे प्रायमरी सैनिक स्कूल 1970 सालापासून चालवले जात आहे. प्रायमरी सैनिक स्कूल असले तरीही ही संस्था खाजगी आहे. या शाळेच्या व्यवस्थापनाने 68 टक्के फी वाढ केली आहे. शाळेचा खर्च भागत नाही हे कारण दाखवत ही फी वाढ केली आहे. वाढलेली फी मान्य नसेल तर आपले पाल्य दुसर्या शाळेत घेवून जा, वास्तविक शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तसेच मुलीना मोफत शिक्षण देण्याचा अधिकार आहे. याचा विसर या शाळेला पडलेला आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाळेचे प्रशाससन पालकांकडून त्यांच्या मंजूरीनुसार फी वसुल करत आहेत. फी वाढीसंदर्भात काही पीटीए मेंबर्सकडून योग्य ते ठराव घेणे गरजेचे असते. हे ठराव एकतर बोगस गेले आहेत. किंवा पालकांच्या ठरावावर बोगस सह्या घेतल्या जात आहेत. याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
शाळेची मुख्य सुरक्षा नोंदणी झालेल्या नियामवलीनुसार चालत नाही. संस्थेच्या खात्यातून मोठ्या रक्कमा दुसर्या संस्थेकडे वर्ग केल्या जात आहेत. या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची फी वाढवून पिळवणूक चालली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची चाललेली पिळवून थांबवावी, आणि घोटाळ्याची चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा लोकशाहीमार्गाने रस्ता रोको, उपोषण आंदोलन केले जातील, असा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे.
पालक संघटनेच्यावतीने सादिकअली बागवान, धीरज दांडेकर, गणेश निकम, वैभव लोकरे, निलेश मुंगसे यांच्यासह सुमारे 100 पालक उपस्थित होते.
शिक्षणाधिकार्यांची घेतली पालकांनी भेट
शिक्षण हा मुलभूत हक्क आहे. तोच हक्क जर कोणी हिरावून घेत असेल तर तो पालक आणि विद्यार्थ्यावर अन्याय आहे, असा पाढा प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांची भेट घेवून त्यांच्याकडे पालकांनी कैफियत मांडली आहे. शिक्षणाधिकारी मुजावर यांनी सर्व पालकांचे गार्हाणे ऐकून घेतले. त्यांनी त्यावर आमचे काम सुरु आहे, निश्चित जिह्यातील सर्वच खाजगी माध्यमांच्या शाळांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |