सातारा रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 09 January 2026


सातारा : येथील रेल्वे स्टेशन परिसरात हॅण्डल लॉक करुन पार्क केलेली १५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी अज्ञाताने लॉक तोडून लंपास केली आहे. रविवारी (दि. ४) दुपारी चार ते मंगळवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अमित अशोक जाधव यांनी याबाबत सातारा शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस हवालदार शिंदे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील कोरेगाव पार्क परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकावर कारवाई
पुढील बातमी
शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंग, एएनएम व जीएनएम, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन रुग्ण सेवेची शपथ

संबंधित बातम्या