दोन दुचाकींची चोरी

by Team Satara Today | published on : 10 October 2024


सातारा : सातारा शहरासह तालुक्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातील सदरबझार येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 क्यू 5026 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 4 ऑक्टोबर रोजी घडली असून याप्रकरणी गंगाधर यमुनाप्पा तळवार (वय 35, रा. सदरबझार) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दुसरी तक्रार तेजस प्रभाकर जाधव (वय 36, रा. चिंचनेर निंब ता.सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एमएच 11 एवाय 9173 या क्रमांकाची दुचाकी चिंचनेर निंब येथून चोरी झाली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जबरी चोरी प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा
पुढील बातमी
शाहूपुरी येथे घरफोडी

संबंधित बातम्या