सातारा : दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी बारा वाजण्याच्या सुमारास संगम माहुली फाटा, सातारा येथे अथर्व किरण कदम रा. संगम माहुली फाटा, सातारा आणि तन्मय यांना लाकडी काठीने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच सुमित बरकडे याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सुडके करीत आहेत.