मरळी येथे 1 ते 5 एप्रिल दरम्यान डोंगरी महोत्सव; महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जबाबदाऱ्या चोख पार पाडा - पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 19 February 2026


सातारा  : मरळी येथे डोंगर महोत्सवाचे 1 ते 5 एप्रिल 2026 या कालाधीत आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत कृषी, पशुपक्षी व बचत गटांच्या उत्पदीत मालाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. याची विविध विभागांनी आतापासून तयारी करावी व विभाग प्रमुखांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत त्या चोख पार पाडाव्यात, असे  निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात डोंगरी महोत्सव तयारीचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला.  या आढावा बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी, पशुपक्षी व बचत गटांचा मेळा आयोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागांशी  सन्मवय साधावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, डोंगरी महोत्सवात भजन, बॅन्ड, पोवाडे व लावणी स्पर्धांबरोबर फुड स्टॉल, फनफेअर यासह मनोरंजन कार्यक्रम असणार आहेत.  डोंगरी महोत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा.

डोंगरी महोत्सवांतर्गत मरळी जवळ कोयना नदी पात्रात नागरिकांना बोटींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या बोटींगसाठी जलसंपदा विभागाने ना हकरत प्रमाणपत्र द्यावे. नाडे-नवा रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसेच ठिक-ठिकाणी रंगरंगोटी करावी. तसेच महोत्सव कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षताही घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जयंतीनिमित्त संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन; छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन
पुढील बातमी
तडीपारीच्या उल्लंघन केल्याप्रकरणी प्रतापसिंह नगर येथील एकावर गुन्हा

संबंधित बातम्या