सातारा : सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये बुधवारी सातारा शहरातील 83 अपक्ष उमेदवारांना प्रांत आशिष बारकुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये 77 नगरसेवकपदाचे उमेदवार तर सहा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
विहित मुदत संपल्यानंतरही यादी अंतिम करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ईव्हीएम मशीनमध्ये यादीत नाव समाविष्ट होताना ते कोणत्या अनुक्रमांकावर आहे. त्या अनुक्रमांक उमेदवारांना उशिरा मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी होती .अपक्ष उमेदवारांना चिन्हासह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 72 तास मिळणार आहे त्यामुळे अपक्ष उमेदवारांची प्रचंड कसरत होणार आहे
प्रांत आशिष बारकुल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार समीर यादव,पालिका मुख्याधिकारी विनोद जळक,निवडणूक समन्वयक मोहन प्रभुणे विश्वास गोसावी या यंत्रणेच्या उपस्थितीमध्ये चिन्ह वाटप प्रक्रिया बुधवारी निर्विघ्नपणे पार पडली. सातारा नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये सहा उमेदवार असून सुट्टी या प्रचलित चिन्हाची दोघांकडून मागणी झाली. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर आणि सागर भिसे यांनी एकच चिन्ह मागितल्याने त्या पद्धतीने चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला भिसे यांना सुट्टी चिन्हाचा कौल मिळाला तर शरद काटकर यांना सूर्यफूल चिन्ह बहाल करण्यात आले.
निवडणूक आयोगाने 194 चिन्हांची यादी पालिकेच्या दर्शनी सभागृहात लावली होती त्यातील चिन्हांचा पसंतीक्रम देण्यासंदर्भात उमेदवारांना आवाहन करण्यात आले होते .जी सामाईक चिन्हे करण्यात आली होती त्यांचा कौल चिठ्ठी टाकून घेण्यात आला. दुपारी तीन वाजेपर्यंत चिन्ह प्रक्रिया आणि त्याचे वितरण करतानाच जिल्हा प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली. उमेदवारांना अनुक्रमांक मिळण्यासाठी सुद्धा बराच उशीर झाला .त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या या कामकाजा संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त होत होती.