पाचवड, दि. १६ : व्हीस्पर व प्रजव फाउंडेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणाचार्य करिअर अकॅडेमी, पाचवड येथे “व्हीस्पर – माय व्हाईस - माय चॉइस” या अभियाना अंतर्गत विशेष मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात पाचवड व वाई येथील अकॅडेमीतील एकूण ९० प्रशिक्षणार्थी मुलींना मासिक पाळी दरम्यान घ्यावयाचा सात्विक आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय, जकातवाडी येथील डॉ. वनिता कांबळे यांनी किशोरवयीन मुलींना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
यावेळी व्हीस्पर कंपनीच्या जिल्हा प्रकल्प समन्वयक सौ. माधवी शेळके यांनी सर्व प्रशिक्षणार्थी मुलींची मोबाईल अॅपवर नोंदणी करून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले.
कार्यक्रमास प्रजव फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अभिजीत भालेराव, उपाध्यक्ष श्री. अमीर सय्यद, कार्याध्यक्ष श्री. अजय पाडळे तसेच द्रोणाचार्य करिअर अकॅडेमीचे संस्थापक श्री. अमोल चव्हाण व श्री. अमित गोळे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढीस लागून मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.