सातारा : फोन केल्यानंतर उचलत नसल्याच्या कारणातून चिडून जावून दोघांनी एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जबरी चोरी केली. ही घटना चारभिंती परिसरात घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश शिंदे (रा.खंडोबाचा माळ), सौद खान (रा.शाहूनगर, सातारा) या दोघांविरुध्द कृष्णात माणिक कदम (वय 25, रा. काशीळ ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 22 डिसेंबर रोजी भाजी मंडई ते चारभिंती येथे घडली आहे. मारहाण करताना संशयितांनी मोबाईल, रोख 4 हजार रुपये व जॅकेट जबरदस्तीने चोरले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.