महाबळेश्वर तालुक्यातील मधाचे गांव मांघर येथील मधपाळांना सोमवारी होणार मधपेट्या वाटप

by Team Satara Today | published on : 01 November 2025


सातारा : मधाचे गांव मांघर येथील मधपाळांना सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सातेरी मधपेट्या वाटप व नामफलक अनावरण करण्यात येणार आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील मधाचे गांव मांघर येथील मधपाळांना आरती ड्रग्ज,लि.बोईसर,मुंबई व स्किलनेट सोल्यूशन्स इंडिया प्रा.लि.मुंबई, यांच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीतून सातेरी मधपेट्या मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात येणार आहेत. यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील मधपाळांना मांघर येथे दि.03 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आहे.

यासाठी रवींद्र साठे, सभापती (राज्यमंत्री दर्जा)महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी,  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई, रवींद्र ठाकरे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई,  नित्यानंद पाटील,उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई,  प्रकाश पाटील अध्यक्ष आरती ड्रग्ज  लि.बोईसर मुंबई, विवेक दामले,अध्यक्ष, स्किलनेट सोल्यूशन्स इंडिया प्रा.लि. मुंबई,  रघुनाथ नारायणकर प्र.संचालक मध संचालनालय महाबळेश्वर,  निसार तांबोळी,प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सातारा,  गणेश जाधव सरपंच मांघर गांव  हे उपस्थित राहणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाघेरीत राजकीय विरोधातून तुंबळ मारामारी; परस्परविरोधी फिर्यादी; सातजणांवर गुन्हा
पुढील बातमी
केरा व मणदुरे योजनेचा आराखडा तयार होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल : पालकमंत्री शंभूराज देसाई, उपसा सिंचनाद्वारे पाणी उचलून देण्याच्या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ

संबंधित बातम्या