साताऱ्यात कामगाराला अज्ञात दुचाकीस्वाराने उडवले

कामगार गंभीर जखमी ; खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

by Team Satara Today | published on : 20 September 2025


सातारा  : पल्स हॉस्पिटलमधून घरी जाणाऱ्या सफाई कामगाराला अज्ञात दुचाकी स्वाराने उडवले. यामध्ये सफाई कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. गुरुवार दिनांक १८ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महेश भगवान जमदाडे वय ३८(रा.इंगळेवाडी पो.नुने ता.सातारा) हे पल्स हॉस्पिटल मधून आपली ड्युटी संपवून घरी जात होते. \

सातारा सिव्हिल हॉस्पिटल ते एसटी स्टँड रोडवर पायी चालत जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने पाठीमागून येऊन त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून शाहूपुरी पोलीस त्या अज्ञात दुचाकी स्वाराचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक बोराटे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
९९ व्या साहित्य संमेलनासाठी देणगी म्हणून दिला पिगी बँकेतील निधी
पुढील बातमी
भारतीय सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून युवकाची लाखोंची फसवणूक

संबंधित बातम्या