सातारा : ट्रकला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रहिमतपूर ते सातारा रस्त्यावरील खोकडवाडी येथे ट्रक धोकादायक बंद अवस्थेत उभा केल्यामुळे दुचाकीस्वार ट्रकला धडकून अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बाजीराव सगन कुंभार (वय 70, रा.केसकर पेठ, सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात 18 जुलै रोजी झाला आहे. याप्रकरणी तुषार बाजीराव कुंभार (वय 39, रा. केसकरपेठ) यांनी युसुफ महम्मदमियॉं आत्तार (रा.शनिवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.