सुहास राजेशिर्के यांच्याकडून भिक्षेकरी गृहामध्ये अन्नदान

देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा

by Team Satara Today | published on : 22 July 2023


सातारा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष व खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुहास राजेशिर्के यांच्यावतीने येथील भिक्षेकरी गृहामध्ये येथील सदस्यांना अन्नदान करण्यात आले. 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै हा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी येथील भिक्षेकरी गृहामध्ये अन्नदानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रदेश कार्यकारणीचे उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप शहर अध्यक्ष विकास गोसावी, राहुल शिवनामे भिक्षेकरी गृहाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
येथील भिक्षेकरी गृहाच्या सर्व सदस्यांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाविषयी बोलताना विक्रम पावसकर म्हणाले, सेवादिनानिमित्त सुहास राजेशिर्के यांनी आयोजित केलेला अन्नदान उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. सेवा हा मानव धर्म आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम मानवतावादी असून अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातूनच माणसांची मदत केली जाऊ शकते. 
सुहास राजेशिर्के या उपक्रमाविषयी बोलताना म्हणाले, अन्नदानासारखे दुसरे पुण्य नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले होते. मानवाची क्षुधा शांती ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे. म्हणून सुहास राजे शिर्के मित्र समूहाच्या वतीने हा अन्नदान उपक्रम राबवण्यात आला. भिक्षेकरी गृहाचे अधीक्षक आणि व्यवस्थापनाच्या वतीने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. भिक्षेकरी गृहातील सदस्यांनी सुद्धा सुहास राजेशिर्के आणि भाजपच्या कार्यकारणीला मनापासून धन्यवाद दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलैला वृक्षारोपण
पुढील बातमी
कळंबे ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाला ठोकले टाळे

संबंधित बातम्या