आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची तक्रार

इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी उत्पादन..

by Team Satara Today | published on : 17 October 2025


अमेरिकेने भारतासह चीनवर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीन भारताच्या बाजूने मैदानात उतरला.  हेच नाही तर भारत आणि चीनमध्ये यादरम्यान महत्वाचे करार झाले आणि भारतासाठी दुर्मिळ खनिज्यांवरील निर्बंध देखील उठवले. सध्या चीन आणि अमेरिकेत तणाव बघायला मिळतोय. अमेरिकेने चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये रशियाकडून चीनने तेल खरेदी बंद केली नाही तर 500 टक्के अमेरिका चीनवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. 100 टक्के टॅरिफ दुर्मिळ पृथ्वी  खनिज्यांवरील निर्बंधांमुळे लावण्यात आला. आता चीन आणि अमेरिकेतील तणावात चीनने भारतावर गंभीर आरोप केला.

भारत इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी उत्पादन वेगाने विकसित करत आहे. दिवसेंदिवस उत्पादन चांगलेच वाढत आहे. सरकारने या क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना सुरू केली. ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठ्या EV बाजारपेठांपैकी एक बनला आहे. तिथेच चीनची पोटदुखी उठली. भारताच्या वाढत्या यशावर चीनचा जळफळाट उठला असून चीन यावरून नाराज आहे.

हेच नाही तर चीनने थेट भारताविरोधात जागतिक व्यापार संघटनेत (WTO) तक्रार दाखल केली आहे. चीनचे म्हणणे आहे की, भारताच्या अनुदान योजना जागतिक व्यापार नियमांचे उल्लंघन करत आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. चीनला भारताने त्यांच्यासारखे धोरण थांबवावे वाटतंय. वेगाने विस्तारणाऱ्या भारतीय औद्योगिक धोरणाला धोका असल्याचेही चीनने म्हटले आहे.

भारतीय कंपन्यांना देशांतर्गत अधिक इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी तयार करता याव्यात यासाठी अनुदान दिले जाते. मात्र, यामुळे चीनच्या कंपन्यांना फटका बसत आहे. भारत स्वत: चे इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी तयार करत असल्याने चीनने धसका घेतला. भारताच्या सबसिडी नियमांच्या विरुद्ध आहेत, कारण त्यांच्यााकडून परदेशी कंपन्यांना समान संधी दिली जात नाही आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आयात कमी करण्याचा प्रयत्न करतात, असा थेट आरोप चीनने केला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहरुख, आमिर आणि सलमानचा 'मिस्टर बीस्ट' सोबतचा फोटो व्हायरल
पुढील बातमी
भाजप कोअर कमिटीची बैठकीत महायुतीचा फॉर्म्युला व मैत्रीपूर्ण लढतीच्या फॉर्मुल्यावर चर्चा

संबंधित बातम्या