सातारा : महामार्गावरील उडतारे फाटा येथे एसटीने दुचाकीला ओव्हरटेक केल्यानंतर त्याचा राग आल्याने सीआरपीएफमधील जवान व त्याच्या साथीदाराने एसटी चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय गणपत शिर्के (वय 31, मूळ रा.आढूळ ता.पाटण सध्या काश्मीर) व रोहीत रघुनाथ साळुंखे (वय 24, रा. चिखली, पुणे) या दोघांविरुध्द विलास भगवान उमापे (वय 47, रा. उंब्रज ता.कराड) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यातील अजय शिर्के हा सीआरपीएफ जवान आहे.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा