सातारा जिल्ह्यातील २०८३ शिक्षकांच्या बदल्या; दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मिळणार दिलासा

by Team Satara Today | published on : 21 October 2025


सातारा  :  जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा मोठा टप्पा अखेर पूर्ण झाला असून, एकूण २०८३ शिक्षकांच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे बदल्या झाल्या आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी यांनी दिली.

या वेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, ही बदली प्रक्रिया माहे मे २०२५ पासून सुरू झाली होती. या प्रक्रियेत विविध संवर्गांमध्ये झालेल्या बदल्यांचे तपशील पुढीलप्रमाणे आहे. विशेष शिक्षक संवर्ग भाग-1 : १७४३ पैकी ४४३ बदल्या, विशेष शिक्षक संवर्ग भाग-2 (पती-पत्नी एकत्रिकरण) : २२४ पैकी २१३ बदल्या, विशेष शिक्षक संवर्ग भाग-3 (बदली अधिकार प्राप्त) : ६०१ पैकी २४० बदल्या, बदली पात्र शिक्षक पहिला टप्पा : १६१० पैकी ११५३ बदल्या, बदली पात्र शिक्षक दुसरा टप्पा : ४५७ पैकी ६४ बदल्या. 

या पाच टप्प्यांमधून एकूण २०८३ शिक्षकांच्या बदल्या पार पडल्या आहेत.दरम्यान, दिव्यांग प्रमाणपत्र अथवा शारीरिक पडताळणीअंती अपात्र किंवा अयोग्य ठरलेले तसेच आरोग्य तपासणीत प्रलंबित असलेले १८५ शिक्षक या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहेत. तसेच,  उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून बदली झालेल्या शिक्षकांना ऑक्टोंबर च्या शेवट च्या आठवड्यात कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या अनेक शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऐन दिवाळीत भाजपा पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार
पुढील बातमी
दिवाळीच्या मुहूर्तावर राजवाडा परिसरातील लाईट गुल; सदन येथील डीपी पेटल्याने अडचण,सातारकरांची अंधारात खरेदी

संबंधित बातम्या