सत्यमनगर येथून दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 26 April 2025

सातारा : सत्यमनगर येथून अज्ञाताने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सत्यम नगर पेट्रोल पंपाजवळील बिरदेव मंदिराजवळ राहत्या घराच्यासमोर उभी केलेली दुचाकी (एमएच 11 बीएक्स 1078) दि. 24 रोजी अज्ञाताने चोरुन नेली. रामाप्पा पुजारी (वय 42) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक देखणे तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा