262- सातारा व 262- पाटण विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून वंदना वैद्य यांची नियुक्ती

by Team Satara Today | published on : 29 October 2024


सातारा : विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत 262- सातारा व 261- पाटण विधानसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून श्रीमती वंदना वैदय (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती वैदय ह्या काल दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी कर्तव्यावर हजर झाल्या असुन त्यांचे निवासाचे ठिकाण सातारा येथील नविन विश्रामगृह या ठिकाणी आहे. संपर्कासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा Constituency Fax No.:- ०२१६२-२३४८०१, Constituency Telephone No :- ०२१६२-२३२४६७, Mobile No:- ९४०३७८६९७१, E-mail id :- gosatara26200@gmail.com

262-सातारा व 261 पाटण विधानसभा मतदारसंघातील राजकीय पक्ष प्रतिनिधी व नागरीक यांच्या संपर्कासाठी श्रीमती वंदना वैदय (भा.प्र.से.) वरील ठिकाणी दररोज दूपारी ३.०० ते ५.०० या वेळेत उपस्थित राहणार आहेत. दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी वंदना वैदय (भा.प्र.से.) यांनी २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच निवडणूकीचे कामकाजा बाबत आवश्यक त्या सुचना व मार्गदर्शन केले व सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

यापुढे पाटण मतदारसंघामध्ये सुध्दा त्यांचा पाहणी दौरा होणार असून संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवून त्या आयोगास वेळोवेळी अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी 262 सातारा विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपाची चौथी उमेदवार यादी जाहीर
पुढील बातमी
आदर्श दिवाळी

संबंधित बातम्या