अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

by Team Satara Today | published on : 11 February 2025


सातारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आयसीडीएस अंतर्गत नसलेले काम त्यांच्यावर तहसील व कृषी खात्याने टाकले आहे. यासह त्यांच्या रखडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, या मागणीसाठी सातारा जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षका, सेविका संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

कोरोनाच्या महामारी काळात अंगणवाडी भगिनींनी कोणतीही काळजी न करता महिला व बालसंगोपनाचे कार्य केले. त्याला चार वर्षे झाले तरी, अद्याप भत्ता मिळाला नाही. बैठकीत वरिष्ठांनी सूचना देऊनही त्याच्याबाबत निर्णय झाला नाही. अंगणवाडी सेविकांना मासिक पेन्शन मिळावी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक फॉर्म भरल्यास त्याला ५० रुपये भत्ता देण्यात येणार होता. तोही अद्याप मिळाला नाही. याबाबत दि. २ मार्च पर्यंत निर्णय न झाल्यास सोमवार दि. ३ ऐवजी आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ॲड. नदीम पठाण, सुजाता रणनवरे,  माया जगताप, सुरेखा डोळसे, सुरेखा शिंदे, वर्षा पवार,  मालन जाधव, छाया पन्हाळकर, अर्चना अहिरेकर आदी उपस्थित होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबईत फर्निचर मार्केटला भीषण आग
पुढील बातमी
धरणग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

संबंधित बातम्या