ओबीसी सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी गौरी गुरव

by Team Satara Today | published on : 24 May 2025


सातारा : अखिल भारतीय ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी गौरी गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.गौरी गुरव या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून आपल्या समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल गौरी गुरव म्हणाल्या, महापुरुषांचे कार्य आणि विचार समाजापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभावना आणि सामाजिक बांधिलकीची भावना जपून समाजात काम करणार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आज प्रलंबित असून त्याला वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे. समाजात असणारे प्रश्न व समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे गुरव यांनी यावेळी सांगितले. संघाचे संस्थापक अध्यक्ष हणमंत सुतार यांच्या आदेशानुसार आणि उपाध्यक्षा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य सौ . अर्चनाताई गुरव यांनी त्यांची निवड केली आहे. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष प्रा. नानासाहेब टेंगले, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ, सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्षा आकांक्षा कुंभार, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वंदना कुमावत तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. गौरी गुरव यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केमिकल वापरून पिकवलेला आंबा कसा ओळखायचा?
पुढील बातमी
झेडपीचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे यांचे निधन

संबंधित बातम्या