मे.म्हसवडकर एजन्सी सातारा येथे जिल्हास्तरीय प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा लोकार्पण सोहळा व कृषी मेळावा उत्साहात संपन्न

by Team Satara Today | published on : 27 July 2023


सातारा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा लोकार्पण सोहळा व कृषी मेळावा सातारा येथील मे. म्हसवडकर एजन्सी मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मा.प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील १ लाख २५ हजार  प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्राचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

आर.सी.एफ. जिल्हा कार्यालय व म्हसवडकर एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून  सातारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास कोल्हापूर येथील आर.सी.एफ.चे क्षेत्रीय प्रभारी विपणन विभागाचे योगेश वेंगुर्लेकर, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुनीलतात्या काटकर, तसेच आर.सी.एफ. कोल्हापूरचे वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी वासुदेव निखारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रमास भाजपाचे नगरसेवक श्री शहाणे, विकास  गोसावी,  सुवर्णाताई पाटील, अविनाश कदम, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ, जिल्हा गुण नियंत्रक कृषी विभाग संजय फडतरे, पंचायत समिती कृषी अधिकारी सत्यजीत शिंदे, सातारचे ज्येष्ठ उद्योजक राजन शेठ शहा मामनिया यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील मान्यवर शेती उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजस्थान मधील सिकर येथे आयोजित केलेल्या प्रमुख कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की देशातील या केंद्रांवर एका छताखाली अनेक सुविधा मिळण्याचे भाग्य आता शेतकऱ्यांना लाभले आहे यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर राजस्थानचे राज्यपाल व विविध मंत्र्यांची प्रमुख उपस्थिती होती.

सातारा येथील म्हसवडकर एजन्सी मध्ये कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाल्यावर म्हसवडकर एजन्सी च्या वतीने शशांकभाई शहा तसेच योगेश वेंगुर्लेकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. 

आपल्या प्रास्ताविक भाषणात वेंगुर्लेकर म्हणाले की सातारा जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय प्रधानमंत्री किसान समृध्दी केंद्र साठी  मे.म्हसवडकर एजन्सी यांची निवड झाली ही अभिनंदन गोष्ट आहे विविध कृषी केंद्रांचे उद्घाटन होत असताना शेतकरी बंधूंना बीज परीक्षण खताचाचणी तसेच शास्त्रीय माहिती या केंद्राद्वारे उपलब्ध होत आहे सर्व कृषी विभाग या केंद्राशी संलग्न राहतील सध्या जिल्हा व तालुका पातळीवर ही केंद्र सुरू करत असताना लवकरच गाव पातळीवर ही केंद्रे लोकार्पण केली जातील आर.सी.एफ. कंपनीने जिल्ह्यामधे २०६ ठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत तसेच माहितीसाठी दूरदर्शन लावले आहेत आजच्या या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सल्फर कोटेड युरिया लोकार्पण केला जात आहे पीक वाढीसाठी या युरियाची खूप उपयोगीता असून आपल्या पिकाच्या वाढीसाठी नत्राची मोठी गरज असते हे लक्षात घेऊन आज हा युरिया विकसित करण्यात आला आहे आज या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होत असताना आम्हा सर्वांना विशेष आनंद होत आहे.

आपल्या भाषणात धैर्यशील कदम यांनी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची उद्दिष्टे  ठरवण्यात आली आहेत त्या मध्ये,शेतक-यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, किटक नाशके हे एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणे. शेतक-यांना माती, बियाणे, आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे. किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध आहे. त्या केंद्रांशी शेतक-यांना जोडून देणे. शेतक-यांना लागणा-या अन्य सेवा विक्री पध्दतीने किंवा कस्टम हायरींग सेंटर द्वारे उपलब्ध करून देणे. शेतक-यांना विविध गोष्टींबाबत माहिती पुरविणे. केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे. खते, औषधे, किटक नाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल, टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे यांचा समावेश आहे असे  सांगितले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजीत पाटील, जिल्हा प्रभारी आर.सी.एफ. सातारा यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सातारा ची कृषी विकास अधिकारी विजय माईनकर उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ जिल्हा नियंत्रक संजय फडतरे. मोहीम अधिकारी दत्तात्रय येले,सातारचे ज्येष्ठ उद्योजक राजन शेठ शहा मामनिया ,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुवर्णाताई पाटील महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिता शहा, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाश कदम, सातारा जिल्हा भाजप सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार ,शहराध्यक्ष विकास गोसावी ,सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे,  नितीन कदम ,उद्योग आघाडीचे अमोल सणस, प्रशांत जोशी,निलेश शहा, विक्रम बोराटे, चैतन्य र्किरण गोगावले ,निर्मला पाटील, ऍड विनीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ऑनलाइन पद्धतीने या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो मान्यवर शेती उत्पादक शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी म्हसवडकर   एजन्सीचेवतीने शशांकभाई शहा तसेच आर.सी.एफ. जिल्हा प्रभारी विश्वजीत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्य शासनाच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी 5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे अहवान
पुढील बातमी
फुटक्या तळ्यात मेलेल्या माशांवर परिसरातील मांजरांचा हल्लाबोल.. 

संबंधित बातम्या