कास पठारावर दहा आसनी ई व्हेईकलचे उद्घाटन; पुष्प हंगामात पर्यटकांची मोठी सोयी

by Team Satara Today | published on : 28 September 2025


सातारा  : कास पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी ई कार्ट व्हेईकल रविवारी दाखल झाल्या. दहा आसनी वाहनांचे जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त पुणे सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते कास पुष्प पठारावर ई वेहिकल सफारी गाडीचे उद्घाटन झाले. यावेळी शिक्षण आयुक्तांच्या पत्नी अर्चना प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कास पुष्प पठार येथे उपस्थित होत्या. कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या प्रदूषणमुक्त सफारीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे मान्यवरांनी आवाहन केले.

यावेळी सातारा व मेढा वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप जोपळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा धनंजय चोपडे, वनपाल बामणोली श्रीमती उज्वला थोरात, वनपाल रोहोट राजाराम काशीद, वनरक्षक कास समाधान वाघमोडे, वनरक्षक दत्तात्रय हेर्लेकर, वनरक्षक आकाश कोळी, वनरक्षक तुषार लगड, वनरक्षक राहुल धुमाळ व संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास, एकीव आटाळी, कुसुंबी, पाटेघर, कासानीचे अध्यक्ष, सचिव व ग्रामस्थ उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागात ऑरेंज अलर्ट
पुढील बातमी
खोडजाईवाडीत डोळ्यात मिरचीपुड टाकून मंगळसुत्र लंपास

संबंधित बातम्या