सातारा : दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतेश्वर घाटात दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात राहूल शिवाजी कार्वे (वय ३२, रा. यवतेश्वर, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २५ सप्टेबर राेजी यवतेश्वर घाटात घडली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.