राजापूरमध्ये उभा राहणार 13 एकर जागेत वसुंधरा वनराई प्रकल्प

13 एकर क्षेत्रामध्ये बायफ संस्थेच्या मदतीने वसुंधरा वनराई

by Team Satara Today | published on : 15 December 2025


पुसेगाव   :  राजापूर हे खटाव तालुक्यामध्ये वसलेले एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे गाव आहे, ज्याला संस्थानिक वारसा लाभलेला आहे. या बरोबर नैसर्गिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. तिन्ही बाजूने डोंगर आणि मध्येच वसलेले टूमदार गाव.याच राजापूरमध्ये एक दोन नाही तर 13 एकर क्षेत्रामध्ये बायफ संस्थेच्या मदतीने वसुंधरा वनराई प्रकल्प चालु होत आहे.

हा खटाव तालुक्यातील कदाचित पहिलाच सर्वात मोठा वनराई प्रकल्प आहे. या कामी बायफ संस्थेने सटवाई मंदिर टेकडीवर जवळपास एकरा लाख 80 हजार  लिटरचे शेततळे उभे करून दिले आहे.  सटवाई मंदिर परिसरात जवळपास 13 एकर मध्ये 16 प्रकारची जवळपास तीन हजार  जंगली झाडे लावण्याचे उद्देश आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी बायफ संस्था, राजापुरातील सर्व ग्रामस्थ तसेच राजापूरवर विशेष प्रेम असणारे मुंबई पुणेकर यांच्या संयुक्त भागीदारीतून भरीव निधी उभा करून राजापूर मधील एक सर्वोत्तम निसर्गरम्य ठिकाण उभे करणार असल्याचे सांगितले. अशी माहिती बायफ संस्थेचे जनप्रतिनिधी अजित दिडके यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
९९ व्या साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे मंगळवारी लोकार्पण; साहित्य संमेलनाच्या कार्यालयात आयोजन
पुढील बातमी
नाशिकचे तपोवन वाचवण्यासाठी साताऱ्याचे भूमिपुत्र सरसावले; जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

संबंधित बातम्या