सातारा : दोन जणांना मारहाण करून दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी चौकातील उत्तम किराणा स्टोअर अँड पान शॉप येथे दुकान मालक आलीम खुदबुद्दीन पठाण रा. शाहूपुरी चौक, सातारा हे त्यांचा मित्र राज कोकरे यांच्या सोबत बसले असताना अविनाश मारुती खवले रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा याला सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून खवले आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी पठाण आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच पान शॉप वर दगड मारून पान शॉप चे नुकसान केले आहे. अधिक तपास गुरव करीत आहेत.