पाचगणी : पाचगणी येथील घाटजाई मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखा व पाचगणी पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई करत कोकेन सारख्या अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोकण सदृश्यपदार्थ मोबाईल हँडसेट दोन-चार जाती वाहने असा 42 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सावरी येथील प्रकरणानंतर लगेचच पाचगणी पोलिसांनी कोकेन सदृश्य पदार्थ पकडल्याने जिल्ह्यात अमली पदार्थांचे नेटवर्क उभे राहत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
याप्रकरणी मोहम्मद नावेद सलीम परमार (वय 32 रा. हाजी बिल्डिंग तिसरा मजला रूम नंबर 34 भेंडी बाजार मुंबई), सोहेल हर्षद खान (वय 35, 202 दुसरा मजला दीनानाथ बिल्डिंग पीबी मार्क मुंबई), मोहम्मद ओएस रिजवान अन्सारी (वय 32 रा. गोल दरवाजा शुक्लाज इस्टेट नागपाडा मुंबई),वासिल हमीद खान (वय 31 रा. बोरी चाळ पहिला मजला नागपाडा मुंबई),मोहम्मद साहिल अन्सारी (वय 30, शिलाजी टावर मुंबई सेंट्रल) , जीशान इरफान शेख (वय 31, मुनसी बिल्डींग पहिला मजला भायखळा मुंबई),सैफ अली कुरेशी (वय 31, हाजी सुलेमान बिल्डिंग दुसरा मजला मज्जिद गल्ली मुंबई),मोहम्मद उबेद सिद्दिकी (वय 27 नवाब आयास ट्रस्ट बिल्डिंग रूम नंबर 216 भेंडी बाजार मुंबई),अली अजगर सादिक राजकोटवाला (वय 30, आशियाना अपार्टमेंट दारुल मोहदा टॉवर नागपाडा मुंबई) ,राहीद मुक्तार शेख (वय 31 रा. अरबलेन बोरी बिल्डिंग रूम नंबर 45 ग्रँड रोड मुंबई) या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणांमध्ये मोहम्मद नावे परमार हा हिस्टरी सीटर असून त्याच्या माध्यमातून इतर नऊ जण मुंबईवरून पाचगणीत आले होते. त्यांच्या ताब्यातील कोकण सदृश्य अमली पदार्थ हा त्यांनी सेवन करण्यासाठी अथवा विक्रीसाठी आणला होता का या दृष्टीने पाचगणी पोलिसांचा तपास सुरू आहे .पाचगणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना घाटजाई मंदिराजवळ एक संशयित इसम अमली पदार्थ घेऊन आला असल्याची माहिती मिळाली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी तात्काळ पवार यांना तपासाच्या सूचना दिल्या .स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाचगणी पोलीस यांनी घाटजाई मंदिर परिसरात दोन वाहने अडवून त्यामधील इसमांची झडती घेतली गाडीच्या ड्रायव्हर सीटवर बसलेला इसम हा प्राप्त बातमीतील वर्णनाचा आढळून आला. या इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच लाख रुपये किमतीचे कोकण सदृश्य अमली पदार्थ मोबाईल हँडसेट इतर साहित्य व दोन चार चाकी वाहने असा 42 लाख 85000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत पोलिस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, निलेश फडतरे, प्रवीण फडतरे, विशाल पवार, रवींद्र कदम, श्रीकांत कांबळे, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे, अमोल जगताप, गोकुळ बोरसे, सतीश पवार, विनोद पवार, ज्योती पोळ यांनी भाग घेतला होता. या इसमांच्या विरोधात एनडीपीएस ऍक्ट कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर करत आहेत.
सातारा पोलिसांची यंत्रणा अलर्ट मोडवर
सावरी ता. जावली येथे मुंबई पोलिसांनी छापा मारून 115 कोटी रुपये किमतीचे 43 किलोमीटर जप्त केले होते .या प्रकरणातील समीर डीजे याला सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे .इतक्या मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स ताब्यात घेतल्यानंतर सातारा पोलिसांना त्याची गंधवार्ता नव्हती अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची धूळ खाली बसत असतानाच पाचगणी पोलिसांनी संबंधित इसमांकडून कोकण सदृश्य अमली पदार्थ जप्त केले.या प्रकरणाचा मास्टरमाइंड परमार हाच असून त्याने हे पदार्थ सेवनासाठी आणले होते का विक्रीसाठी यादृष्टीने कसून तपास केला जात आहे.