सातारा : शाहुपुरी येथील सनराईन मॉर्निंग ग्रुपतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील घरेलु कामगार महिलांचा सत्कार व त्यांना भांडी वाटपाचा कार्यक्रम दि. 8 मार्च रोजी अंबदरे येथील महालक्ष्मी मंदिर येथे झाला.
यावेळी विशेष अतिथी म्हणून नामदेव हेंद्रे,.नरेंद्र ढवळे, सौ.नेहा शिंदे आणि पायल जाधव हे उपस्थित होते.
कार्यक्रमास ग्रुपचे सर्व सदस्य प्रा.डॉ. राजन मोरे,अयुब तांबोळी, दिपक ओवाळ, महेश शिंदे, नंदन खोले, सिध्दाप्पा पवार, सतीश जाधव, दत्तात्रय खटावकर, सुरेश दुदुस्कर, दिघे टेलर उपस्थित होते.
यावेळी अयुब तांबोळी,सतीश जाधव,नरेंद्र ढवळे,नामदेव हेंद्रे, सौ.नेहा शिंदे व पायल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.