दोन चौक तसेच एका मार्गाचे नामांतर करण्याची मागणी

युवा राज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांचा पाठपुरावा

by Team Satara Today | published on : 07 April 2025


सातारा : जुन्या पारंगे चौकाचे नामांतर माहिती अधिकार चौक व जुना आरटीओ चौकास संविधान चौक तसेच वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास शिवतीर्थ मार्ग असे नामांतर करण्याची सातारा वासियांची मागणी आहे. याबाबत महारुद्र तिकुंडे (माहिती अधिकार) संस्थापक - अध्यक्ष युवा राज्य फाऊंडेशन हे पाठपुरावा करीत आहेत.

सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा असून या जिल्ह्यास ऐतिहासिक वारसा आहे. श्री. छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आहे. प्रत्येक नवीनतम उपक्रमाची सुरवात करण्यास सातारा जिल्हा अग्रेसर आहे. अश्या या शहरातील जुन्या पारंगे चौकास माहिती अधिकार चौक व जुना आरटीओ चौकास संविधान चौक आणि वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास शिवतीर्थ मार्ग असे नामांतर केल्यास जनसामान्यापर्यंत या कायदा व इतिहासाविषयी जनजागृती कायम स्मरणात राहील.

माहिती अधिकार कायदा हा सर्व सामान्यांना आपल्या न्यायिक हक्कासाठी न्याय मिळवून देण्यासाठी वापरला जातो. या कायद्याची म्हणावी अशी जनजागृती समाजात व प्रशासनामध्ये झालेली दिसून येत नाही. या चौकास तसे नाव दिल्यास सर्वसामान्यांना यामुळे वेळोवेळी कायद्याची जाणीव राहील. या देशाचा पवित्र ग्रंथ म्हणून संविधानाकडे पहिले जाते. सर्वसामान्य, दीनदलित, गोरगरीब, सर्व जाती धर्मातील समाजाला संविधानामधून न्याय मिळत आहे. श्री. छ. शिवाजी महाराज यांची देश विदेशात ख्याती आहे. पोवई नाका येथे मिळणार्‍या आठ रस्त्यांच्या मधोमध श्री. छ. शिवाजी महाराजांच्या नावाने शिवतीर्थ उभारण्यात आले आहे. सर्व शिव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या शिवतीर्थाच्या नावाने वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास शिवतीर्थ मार्ग नाव दिल्यास श्री. छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव लोकांपर्यंत पोहोचेल.

यासाठी सातारा शहरातील जुन्या पारंगे चौकास माहिती अधिकार चौक व जुना आरटीओ चौकास संविधान चौक तसेच वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्यास शिवतीर्थ मार्ग असे नामांतर करण्याची मागणी सातारा वासियांनी नगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात महारुद्र तिकुंडे (माहिती अधिकार) संस्थापक - अध्यक्ष युवा राज्य फाऊंडेशन हे पाठपुरावा करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोनाली कुलकर्णीचा 'हा' मराठी सिनेमा पाहून विद्या बालनने केलेलं कौतुक
पुढील बातमी
तारळी धरणग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

संबंधित बातम्या