सातारा : माहिती अधिकारात माझ्याविरोधात सातारा पालिकेत अर्ज का केलास, असे विचारत अजय संजय पार्टे (वय 34, रा. गोडोली सातारा) यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नगरसेवक शेखर मोरे-पाटील व प्रवीण मोरे (रा. गोडोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ही घटना दि. 14 रोजी रात्री साडेसात वाजता गोडोली येथे घडली आहे. अजय पार्टे हे घराशेजारील समाज मंदिराजवळ बसले होते. त्यावेळी तेथे नगरसेवक शेखर मोरे-पाटील हे उभे होते. यावेळी ते म्हणाले, ‘तू माहिती अधिकारात माझ्या विरूद्ध सातारा पालिकेत अर्ज का केला आहेस’, असे म्हणून त्यांनी अजय पार्टे यांचा हात धरून बोटे पिरगळून त्याचा हात पाठीमागे घेतला. त्यावेळी मोरे यांचा मित्र प्रवीण मोरे हा तेथे आला. त्याने देखील अजय पार्टे यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.