नोकरीच्या अमिषाने फसवणूकप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 November 2025


सातारा  : रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून १९ जणांची ३८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याच्या पतीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सदाशिव कल्लपा नाईक (रा. तासगाव, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत नंदकुमार शंकर पाटोळे (रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदावर नोकरी लावतो असे सांगून नाईक याने २०२२ ते २०२३ या कालावधीत १९ जणांकडून ३८ लाख ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर नोकरी लागल्याची नियुक्तीपत्रे त्याने दिली. परंतु, ही प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर वेळोवेळी मागणी करूनही त्याने पैसे परत न देता फसवणूक केल्याचे पाटोळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैदापूर, ता. कराड येथील हॉटेलला आग लागून दोन लाखांचे नुकसान कराड : कराड-विटा मार्गानजीक सैदापूर, ता. कराड येथील ओम साई कॉम्प्लेक्समधील चायनीज सेंटरला मंगळवारी (दि. 4) मध्यरात्री आग लागून, सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ज्ञानेश्वर शिवलिंग कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सैदापूर येथील जेके पेट्रोल पंपाजवळच्या ओम साई कॉम्प्लेक्समध्ये कुंभार यांचे डीके चायनीज बिर्याणी कॉर्नर हे हॉटेल आहे. कुंभार यांनी मंगळवारी रात्री उशिरा हॉटेल बंद केले. त्यानंतर मध्यरात्री हॉटेलल
पुढील बातमी
सदरबझार येथील विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या