अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 January 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यात अल्पवयीन मुलीची छेड काढून, पाठलाग करुन मोबाईल नंबर मागितल्याप्रकरणी ऋषीकेश मिसाळ याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 25 जानेवारी रोजी घडली आहे. याप्रकरणी मुलीचे आई युवकाला समजवण्यासाठी गेली असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी केली. यावरुन पोलिसांनी युवकाविरुध्द विनयभंगसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या आंदोलन प्रकरणी चारजणांवर गुन्हा
पुढील बातमी
मुस्लिम समाज प्रजासत्ताक दिन ईदप्रमाणेच साजरा करत आहे : सादिकभाई शेख

संबंधित बातम्या