सातारा : युगप्रवर्तक कविवर्य बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त मसाप, पुणे शाहुपुरी शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्मृतीदिन गुरुवार दि. २० मार्च रोजी मर्ढे येथे होणार असल्याची माहिती मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने कविवर्य बा.सी. मर्ढेकरांच्या मर्ढे येथील घराचे नूतनीकरण आणि स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. या स्मारकात कविवर्य मर्ढेकर यांचा स्मृतीदिन गुरुवार दि. २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मसाप पुणेचे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी मसाप, पुणे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, मर्ढेचे सरपंच सविता शिंगटे, उपसरपंच विक्रम शिंगटे, अंजिक्यतारा कारखान्याचे संचालक नितीन पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मर्ढेकरप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि सदस्यांनी केले आहे.