श्रावण महिन्यातील उपवासाला सकाळच्या नाश्त्यात बनवा कुरकुरीत मेदू वडे

by Team Satara Today | published on : 08 August 2025


श्रावण महिन्यात केलेले उपवास आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. श्रावणात प्रत्येक दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. तसेच अनेक घरामध्ये पूजा, व्रत इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. श्रावण महिन्यात महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवास केल्यानंतर प्रामुख्याने साबुदाणे किंवा वरीच्या तांदळापासून बनवलेल्या भाताचे सेवन केले जाते. मात्र उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यास पोटात ऍसिडिटी वाढू लागते. त्यामुळे उपवास केल्यानंतर साबुदाणे अजिबात खाऊ नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे मेदू वडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मेदू वडे खायला खूप जास्त आवडतात. उपवासाचे मेदू वडे तुम्ही दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. यामुळे पदार्थाची चव आणखीनच भारी लागेल.चला तर जाणून घेऊया उपवासाचे मेदू वडे बनवण्याची सोपी रेसिपी

साहित्य: हिरव्या मिरच्या भगर साखर मीठ बटाटे शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर दही तेल

कृती:

मेदू वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर भगर स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये पाणी घेऊन भगर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर पाण्यात भगर काहीवेळ भिजत ठेवा. मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भगर घालून शिजवून घ्या. शिजवून घेतलेली भगर मोठ्या वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हातांना पाणी लावून मेदू वडा बनवून कढईमधील गरम तेलात तळून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उपवासाचे मेदू वडे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
पुढील बातमी
20 ऑगस्टपर्यंत शस्त्र व जमावबंदी

संबंधित बातम्या