अवैधरित्या प्राण्यांची कत्तल केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 May 2025


सातारा : अवैधरित्या प्राण्यांची कत्तल केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातार्‍यातील प्रतापसिंहनगर येथे जनावरे कापण्याचा व मांस विक्री परवाना नसतानाही मांस विक्री करणार्‍या दोघांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पशु वैद्यकीय अधिकार्‍याने मांसाची पाहणी केली असता ते म्हैशीचे किंवा रेड्याचे मटण असल्याचे प्राथमिक स्वरुपात म्हटले आहे.

सरफराज जब्बार कुरेेशी (वय 31, रा. कोरेगाव) व मुसा रजाक कुरेशी (वय 65, रा.सदरबझार, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस सुहास कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भांबवली येथे मिनी बस खड्ड्यात कोसळून तीनजण जखमी
पुढील बातमी
सासरच्या त्रासास कंटाळून जावयाची आत्महत्या

संबंधित बातम्या