सातारा : येथील बसस्थानक ते पोवई नाका रस्त्यावर नियमांचा भंग करत वाहन चालवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी दुपारी 5 वाजता हा प्रकार घडला. पोलीस कॉन्स्टेबल दिंगबर गंगाराम माने यांनी फिर्याद दिली असून, प्रवीण विजय जाधव (वय 31, रा. रविवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. डी. जाधव तपास करत आहेत.