सातारा : प्रतापगडच्या पायथ्याला छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला हा इतिहास शिवपराक्रमाचा साक्षीदार आहे .येथे अफजलखान वधाचे शिल्प लावले जावे ही शिवप्रेमींची भावना आहे या तीव्र भावना लक्षात घेऊनच या संदर्भात तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक लावली जाईल, असे स्पष्ट आश्वासन प्रतापगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी हिंदू एकटा आंदोलन समितीच्या सदस्यांना दिले.
प्रतापगड प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनामध्ये पार पाडली .या बैठकीला दूरदृष्टी प्रणालीद्वारे पालकमंत्री शंभूराज देसाई,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनउपवनसंरक्षक अमोल सातपुते,प्रांत योगेश खरमाटे,तहसीलदार सचिन मस्के,पुरातत्त्व विभागाचे संचालक विलास वाहने,अशासकीय समितीचे सदस्य नितीन शिंदे, मिलिंद एकबोटे, शरद पोंक्षे, सदाशिव टेंटविलकर ,सोमनाथ धुमाळ, चंद्रकांत पाटील, विजय नायडू इत्यादी यावेळी उपस्थित होते
प्रतापगड प्राधिकरण समितीच्या बैठकीमध्ये राज्य शासनाने दिलेल्या 127 कोटी रुपयांच्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रतापगड किल्ला जतन संवर्धन निविदा मान्यता या संदर्भातील प्रशासकीय मंजुरी घेऊन याबाबत निविदा काढणे आराखड्यातील उर्वरित कामांची परिपुर्तता विद्युत सुविधा प्रतापगडच्या पायथ्याला प्रशस्त पार्किंग तयार करणे इत्यादी कामांचा आढावा घेण्यात आला प्रतापगड देवस्थानच्या जमिनी आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर वनराई आहे तेथे वृक्षतोड झाल्यास पुन्हा वृक्षारोपण करून हा परिसर पर्यावरण समृद्ध करणे तसेच विकास कामांसाठी गरज पडल्यास प्राधिकरण मान्यतेने जमीन वर्ग करणे याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी समितीचे अध्यक्ष या नात्याने मंजुरी दिली
हिंदू एकता आंदोलन समितीच्या वतीने प्रतापगडावर अफजलखानवादाचे शिल्प येत्या 27 नोव्हेंबर पर्यंत बसवले गेले नाही तर आम्ही सातारा सांगली कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील शिवप्रेमी प्रतिशिल्प वाजत गाजत नेऊन प्रतापगड पायथ्याला बसवू असा इशारा देण्यात आला होता याबाबत नितीन शिंदे यांनी तब्बल 24 वर्ष पाठपुरावा केलेला आहे .या संदर्भात राज्य शासन विविध स्वरूपाची कारणे देत आहे त्यामुळे आंदोलक आंदोलनाच्या पवित्रत आहेत अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या यासंदर्भात उदयनराजे भोसले यांनी शिंदे व मिलिंद एकबोटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख घेऊन तातडीने बैठक घेऊ असे आश्वासन दिले.