सातारा : सुमारे 50 हजारांच्या ऐवजाची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 ते 18 मे दरम्यान बॉम्बे रेस्टॉरंट चौक, दत्त मंदिर येथे सुनील विलास पवार रा. सोनगिरीवाडी, वाई, जि. सातारा यांच्याकडील विवो कंपनीचा मोबाईल आणि सोन्याची चैन असा सुमारे पन्नास हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.