सातारा तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 09 January 2026


सातारा  :  येथील तहसिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकावर शाहूपूरी पोलिसांनी कारवाई केली. रवीराज आनंद आठवले (रा. सांगली) असे याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेल्या संशयीताचे नाव आहे. तो गुरुवारी (दि.८) रात्री उशिरा गुन्हा करण्याच्या अनुंषगाने संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याने पोलिसांनी कारवाई केली. पोलिस कॉ. तुषार भोसले यांनी याबाबत सातारा शहर पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. पोलिस हवालदार महांगडे हे या घटनेचा अधिक तपास करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डिसेंबरची पेन्शन मिळाली नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी हवालदिल; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
पुढील बातमी
साताऱ्यातील कोरेगाव पार्क परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकावर कारवाई

संबंधित बातम्या