सातारा : जावळी तालुक्यातील शेंबडी-वाघळी (बामणोली कोयना विभाग) येथील श्री क्षेत्र विनायक नगर येथे येत्या रविवार दि. १५ आणि सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीचा भव्य सोहळा अत्यंत भक्तीभावाने व उत्साहात संपन्न होणार आहे.
प. पू. सद्गुरू श्री नारायण महाराज (अण्णा), श्री क्षेत्र नारायणपूर यांच्या आशीर्वादाने आणि प. पू. टेंबेस्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा येथील श्री गणेश व श्री ब्रविमेश्वर महादेव मंदिरात पार पडणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
असा असेल कार्यक्रम: सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, रविवारी (दि. १५) पहाटे ४ ते ६ या वेळेत रुद्र अभिषेक आणि अथर्वशीर्ष अभिषेक होईल. सकाळी ९ ते ११ सुस्वर भजनाचा कार्यक्रम तर सकाळी ११ ते १२ मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी १२ वाजता भव्य पालखी सोहळा मिरवणूक व कोयनामाई पूजन होईल. दुपारी २ ते ३ महाप्रसाद आणि रात्री १०:३० ते २ या वेळेत विशेष रुद्र अभिषेक होणार आहे.
दुसऱ्या दिवशी, सोमवारी (दि. १६) सकाळी ८ ते १० होम हवन होईल. दुपारी ११ वाजता महाआरती आणि त्यानंतर पारणे व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल.
तरी कोयना, सोळशी आणि कांदाटी या परिसरातील सर्व भाविक भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या जन्म सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे संयोजन ग्रामस्थ वाघळी शेंबडी, दत्त सेवेकरी मंडळ (श्री क्षेत्र विनायक नगर) आणि दत्त सेवेकरी मंडळ (श्री क्षेत्र नारायणपूर, ता. पुरंदर) यांच्या वतीने करण्यात आले आहे.