गुंडाराज विरोधी संयुक्त मोर्चाची सह्यांची मोहीम; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

by Team Satara Today | published on : 01 November 2025


सातारा :  फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी झालेल्या ढिसाळ तपासाचा गुंडाराज विरोधी संयुक्त मोर्चाच्यावतीने सातार्‍यात निषेध करण्यात आला. गुंडाराज प्रशासनाच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेत भाकप लिबरेशनचे विजय परामणे, सीमा पवार अस्लम तडसरकर, राधिका बारटक्के आदी कार्यकर्ते निधर्मी कम्युनिटी पक्ष, शहर सुधार समिती, सर्वश्रमिक संघटना, प्राकृतिक साहित्य पंचायत या संघटना सहभागी झाल्या होत्या. पोवई नाका आणि हुतात्मा स्मारक चौकात ही मोहीम झाली. फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला न्याय मिळावा. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

संबंधित डॉक्टर महिलेने आपल्यावरील राजकीय दबावाची कल्पना वरिष्ठांना दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. या महिला वैद्यकीय अधिकार्‍याची आत्महत्या नसून ती संस्थात्मक हत्या असल्याचा असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तिच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर तिचे प्राण वाचले असते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तीन हजार रुपयांची पहिली उचल देणार- यशराज देसाई; देसाई कारखान्याचा गळीत हंगाम उत्साहात सुरु
पुढील बातमी
वाघेरीत राजकीय विरोधातून तुंबळ मारामारी; परस्परविरोधी फिर्यादी; सातजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या