08:44pm | Sep 18, 2024 |
सातारा : गेल्या अकरा दिवसापासून भक्तीच्या जल्लोषात रंगलेल्या ऐतिहासिक शाहू नगरीने तब्बल 17 तासांच्या मिरवणुकीनंतर आवडत्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या, असा गजर करत भावपूर्ण निरोप दिला. सातारा जिल्ह्यात साडेतीन हजार मंडळे, तर सातारा शहरातील 206 मंडळांच्या गणरायाचे निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि त्यांच्या टीमने परफेक्ट कामगिरी करत विसर्जन मिरवणूक फार काळ रेंगाळणार नाही, याची कसोशीने काळजी घेतली. सातारा पालिकेने लगेच निर्माण व मूर्ती संकलनाचे काम हाती घेतले.
मात्र डॉल्बीचा दणदणाट आणि लेझरच्या ऐवजी फोकस लाईट याचा अतिरेक झाल्यामुळे कुठेतरी नियमांना हरताळ फासला गेल्याची चर्चा गणेश भक्तांमध्ये होती. काही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अत्यंत देखण्या ठरल्या. येथील राजकमल मंडळांनी लाडक्या बहिणीचा देखावा तसेच महिलांचे संरक्षण या विषयांवर देखावे सादर करून सामाजिक जाणिवांची किनार ठेवली. संपूर्ण सातारा शहर डीजेच्या तालावर तब्बल अखंड सतरा तास जल्लोष करत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा रात्री उशिरा विसर्जन सोहळ्यामध्ये एन्ट्री करताच कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोश आला. डीजेच्या तालावर त्यांनी सुद्धा ठेका धरला. बाबाराजेंची ही एन्ट्री चर्चेचा विषय ठरली. मात्र दरवर्षी सातार्यातील विसर्जन मिरवणुकीचा आकर्षण बिंदू असलेले खासदार उदयनराजे भोसले मात्र या विसर्जन सोहळ्यात दिसले नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून सातार्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी जपलेली डीजे मुक्त उत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली. शहरातील बहुतांश गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादेचे नियम धाब्यावर बसवून बाप्पांच्या धुमधडाक्यात विसर्जन मिरवणुका काढल्या. डीजे च्या आवाजाने सर्वसामान्य नागरिकांना कानठळ्यादेखील बसल्या. अखेर बुधवारी सकाळी 9:40 वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेशाचे विसर्जन करण्यात आले. यानंतर 17 तास रंगलेला बाप्पांचा उत्सव शांत झाला.
शहरातील बहुतांश मंडळांनी सकाळी लवकर गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच चिमुरड्यांसह भक्तांची गर्दी शहरातील मुख्य रस्त्यांवर सुरू झाली होती. परंतु सायंकाळी सहा नंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, प्रतापगंज पेठ मार्गे मिरवणुका बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याकडे मार्गस्थ होत होत्या. शहरातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच गणेश मंडळांनी यंदा पारंपारिक वाद्यांची परंपरा जपली. मात्र बहुतांश मंडळांनी अशा वाद्यांना बगल देत डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढल्या. डीजे बरोबरच लेझर लाईटचा वापर देखील करण्यात आला. अनेक मंडळांनी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने व त्यावर वाजविलेल्या रिमिक्स गाण्यांनी मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र कानावर हात ठेवावे लागले. तरुणाई देखील हिंदी-मराठी गाण्यांवर बेभान होऊन थिरकताना दिसून आली.
एक-एक करत मिरवणुका राजपथावरून विसर्जन तळ्याकडे मार्गस्थ होत होत्या. रात्री बारा वाजता सर्व प्रकारची वाद्ये बंद झाली. मानाच्या शंकर-पार्वती गणेशाचे बुधवारी सकाळी 9.40 वाजता विसर्जन करून सातार्याचा मिरवणूक सोहळा शांत झाला. सातारा पालिकेच्या वतीने विसर्जनासाठी चार कृत्रिम तळ्यांची उभारणी तसेच घरगुती गणेश विसर्जनासाठी ठिकठिकाणी छोट्या हौदांची सुविधा प्रदान करण्यात आली होती. तसेच जलतरण तलावातही गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. बुधवार नाक्यावरील तळ्यात क्रेनच्या माध्यमातून मोठ्या गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जन मार्ग व तळ्यांवर पालिका व पोलीस प्रशासनाकडून दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. शिवाय विसर्जन मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. त्यामुळे तब्बल 17 तास चाललेला बाप्पांचा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडला.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |