03:25pm | Mar 04, 2024 |
सातारा : येथील श्री शाहू कला मंदिरात येथील माजी नगराध्यक्ष व मार्गदर्शक स्व. रामकृष्ण नारायण (बन्याबापू) गोडबोले यांचे २५ व्या पुण्यतिथीनिमित्त व कै. सौ. मालतीबाई रामकृष्ण गोडबोले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कला सरगम प्रस्तुत स्वररजनी हा हिंदी-मराठी गीतांचा दर्जेदार कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता.
कार्यक्रम सुमारे तीन तास रंगलेला या कार्यक्रमात सातारच्या स्थानिक गायक कलाकारांनी तसेच वादक कलाकारांनी सादर केलेली आपली कला अनुभवताना सातारकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
आयोजित या कार्यक्रमात ..प्रेमस्वरूप आई ..या गीताने प्रारंभ होत ..स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला ..हृदय प्रीत जागते.. तुला पाहिले मी ..अशी मराठी गाणी सादर झाल्यावर ..जरासी आहट,.. तेरे मेरे मिलने के रहना.. कही सदियों से ..सादर होत ..तू कितनी अच्छी है हे आई वरील गाणे अतिशय सुरेख शर्वरीने सादर केले .त्यानंतर हेमंत जाधव यांचे ..किसी की नजर को तेरा इंतजार.. मराठीतील ..शोधू मी कुठे कशी प्रिया तुला ..ती गेली तेव्हा,रीमझीम पाऊस बरसत होता,.. सादर होत तारे जमीन पर चित्रपटातील ,,मेरी मा ,,पंकज उदास यांना श्रद्धांजली अर्पण करणारे ,,चांदी जैसा रंग ,,सादर होऊन ,,धुंदी काळ्यांना,, म्हणत या कार्यक्रमात काही मान्यवरांचा सत्कार गोडबोले परिवाराच्या वतीने करण्यात आला.
यामध्ये सातारा येथील माजी नगरसेवक व रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मंडळाचे कुटुंब प्रमुख श्रीकांत शेटे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे व दैनिक ऐक्य जे सातारच्या साठी मुखपत्र म्हणून संबोधित केले आहे व त्यांनी नुकतीच शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे याबद्दल गोडबोले कुटुंबीयांच्या वतीने श्रीकांत शेटे, श्रीकांत कात्रे व सौ, शिवानी पळणीटकर-ओक यांचा सत्कार सर्वश्री अशोक गोडबोले, उदयन गोडबोले व डॉ.सौ अनुराधा गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.अच्युत गोडबोले म्हणाले की, गोडबोले परिवाराच्या वतीने सातारा येथील स्वर्गीय भाऊकाका व आई मालतीबाई यांचे स्मरणार्थ कुरणेश्वर खिंडीतील गणपती ट्रस्ट, देवस्थान येथे स्मृती स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे, ते लवकरच पूर्ण दरवर्षी दिला जाणारा ट्रस्टचा सातारा भूषण पुरस्कार यावर्षी हनुमंतराव गायकवाड यांना लवकरच प्रदान केला जाणार आहे. सातारच्या विविध सामाजिक उपक्रमात गोडबोले ट्रस्ट व कुटुंबीय सदैव सहभागी असतात आणि त्याला सातारकरांची उत्तम साथ मिळत आहे. याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले होते.
या कार्यक्रमानंतर गाण्यांकडे वळताना पुन्हा ..न तुम हमे जानो.. ये दिल तुम बिन कही लगता नही.. नैनो मे बद्रा छाये ..इस मोड से जाते है,.. तेरी आखो के सिवा.. आपके हसीना रुख पे.. सादर होत ..जब दीप चले जले आना ..रात का समा.. सादर होत ..आनेवाला पल ..म्हणत शुक्रतारा मंद वारा ..अशी हलकीशी साद घालत.. ने मजसी ने परत माय मातृभूमीला.. हे समूहगीत सादर होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमांमध्ये गायक हेमंत जाधव, प्राजक्ता भिडे, चंद्रकांत शिंदे, अमृता काशिद यांनी गायन सादर केले.
विविध वाद्यांवर वादक सिंथेसायझर-शिवाजी सुतार, राजेंद्र आफळे, तबला-शांताराम दयाळ, हामोंनियम- स्वरा किरपेकर व्हायोलिन- केदार गुळवणी, तालवाद्ये-आशुतोष वाळिंबे ऑक्टोपॅड- विजय कांबळे, गिटार- प्रतिक सदामते यांची साथ होती, ध्वनी व्यवस्था सुभाष कुंभार यांची होती, तर संगीत संयोजन राजेंद्र आफळे यांचे होते. या कार्यक्रमा मागे मुख्य प्रेरणा अनिल वाळिंबे यांची होती. अतिशय सुरेखपणे या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन स्नेहल दामले यांनी केले.
अतिशय रंगलेल्या अशा या तीन तासाच्या गाण्याचे कार्यक्रमासाठी सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |