सातारा शहर पोलिसांना बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड

आढावा बैठकीमध्ये पोलीस अधीक्षकांनी केला गौरव

by Team Satara Today | published on : 16 September 2025


सातारा, दि १६ :  ऑगस्ट 2025 मध्ये सातारा शहर पोलिसांनी तब्बल आठ प्रकारच्या पोलीस कामकाजांमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे .जिल्ह्यातील बेस्ट डिटेक्शनसह इतर सात प्रकारात चांगल्या प्रकारची कामगिरी बजावणारे सातारा शहर पोलीस स्टेशन विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी सातारा शहर पोलिसांच्या टीमचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला आहे. 

सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे ऑगस्ट 2025 मध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातून जिल्हा बेस्ट डिटेक्शन बेस्ट पोलीस स्टेशन मुद्देमाल डिस्पोजल महिला अत्याचार दाखल गुन्ह्यांमध्ये 24 तासाच्या दोषारोप पत्र पाठवणे डायल 112 ची उत्कृष्ट कामगिरी करणे गुन्हेनिर्गतीकरण, मिसिंग निर्गती अकस्मात मयत अर्ज विनंती अशा विविध प्रकारांमध्ये सातारा शहर पोलिसांनी विशेष कामगिरी नोंदवली आहे .

पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गणेशोत्सव बंदोबस्तामध्ये व्यस्त असताना तसेच इतर कायदा सुव्यवस्थेचे गांभीर्य सांभाळून संबंधित पथकाला आणि अमलदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना दिल्या. त्यामुळे सातारा शहर पोलीस बेस्ट ठरले आहेत गुन्हे आढावा बैठकीमध्ये सातारा शहर पोलिसांना गौरवित करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महसूल सेवा पंधरवड्यात विविध योजनांचा लाभ घ्यावा
पुढील बातमी
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून आता निखिल जाधव

संबंधित बातम्या