केळघर येथे सर्पदंशामुळे चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

आई मांडीवर चिमुकलीला भरवत असताच सर्पदंश

by Team Satara Today | published on : 26 September 2025


sसातारा : केळघर, ता. जावली येथे आई चिमुकल्या मुलीला मांडीवर जेवण भरवत असताना चिमुकलीच्या पायाला काहीतरी चावले. परंतु याकडे आईने दुर्लक्ष केले. काही तासातच या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना आज दि. २६ रोजी सकाळी १० वाजता घडली घडली.

याबाबत माहिती अशी की, श्रीशा मिलिंद घाडगे (वय ४, रा. केळघर, ता. जावळी ) या चिमुरडीला तिची आई आज सकाळी मांडीवर बसून भात भरवत होती. त्यावेळी तिच्या पायाला सर्पदंश झाला. त्यावेळी ती मोठ्याने किंचाळली. मात्र आईला वाटले, उंदीर किंवा इतर काही असेल म्हणून तिने या किंचाळण्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष केले. मात्र काही वेळानंतर घरात असणाऱ्या एका बिळातून साप बाहेर आल्याचे कुटुंबीयांना दिसल्यानंतर घरामध्ये एकच धावपळ उडाली. 

काही वेळापूर्वी चिमुरडीला उंदीर नव्हे तर, साप चावल्याची खात्री झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तात्काळ सातारा येथील सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. 

या दुर्दैवी घटनेमुळे केळघरसह पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, 'गोट्या गँगस्टर'चा टीझर लाँच
पुढील बातमी
पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरच युवकांच्या गटात मारामारी

संबंधित बातम्या