सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार व यशवंत विचारांचा वारस ज्योत तेवीत ठेवली. पुरोगामी विचाराचे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यात आलेल्या यशवंत विचार ज्योतीचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन सातारा या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करून पूजन करण्यात आले. ज्योतीला पुष्पहार अर्पण करून यशवंत विचारांचा वारसा जपण्याची शपथ घेतली.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ते कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ प्रीतीसंगम या ठिकाणी यशवंत विचार ज्योत घेऊन जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी नेते बबन कनावजे यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यात यशवंत विचार ज्योत आली. त्याचे स्वागत करून ज्योतीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या वेळेला सातारा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील ,महिला प्रदेश उपाध्यक्ष समिंद्रा जाधव, पारिजात दळवी, समीर घाडगे, निलेश जगदाळे ,अतुल शिंदे, नलिनी जाधव, श्रीमंत भंडारे, चंद्रकांत गवळी, आयेशा पटणी, तेजस्विनी केसरकर व विजय बोबडे, स्वप्निल वाघमारे , शफिक शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा शहर व परिसरातील यशवंत विचारांशी बांधिलकी मानणारे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.