सातारा : इ. 9 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाकडून टॉप क्लास एज्युकेशन इन स्कुल फॉर इतर मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व विमक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्टुडंट अंडर प्रधानमंत्री यशस्वी या योजनेअंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी 9 वी ते 10 वी साठी रु.75 हजार व इ. 11 वी ते 12 वी साठी रु. 1 लाख 25 हजार इतकी वार्षिक आर्थिक सहाय्य शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, परीक्षा फी व गणवेश इ. साठी देण्यात येणार आहे सदर योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड हि गुणवत्तेच्या आधारे केली जाणार असून आर्थिक सहाय्य डीबीटी व्दारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे.
सदर योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यामधील निवडक शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून सदर शाळांची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सातारा यांचेकडे सुपुर्द करण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीमध्ये नमूद शाळेतील मुख्याध्यापकांना, प्राचार्य यांनी आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी या वर्गात शिकणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एकूण 2.5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्याथ्यांचे अर्ज सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता https://scholarships.gov.in या पोर्टलवर दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरुन घ्यावेत, असे आवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांनी केले आहे.